Home > मॅक्स रिपोर्ट > मोदी देशद्रोही आहेत काय? 

मोदी देशद्रोही आहेत काय? 

राफेल विमान व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक मोटा गंभीर आरोप केला आहे. राफेल व्यवहारात मोदींनी गोपनीयतेचा भंग केला असून ते देशद्रोही असल्याचं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मोदी हे भ्रष्टचं व्यक्ती असून त्यांनी उद्योगपती अनिल अंबानीसाठी मध्यस्थाची भूमिका वठवल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केलाय. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली असून त्यामुळेच ते देशद्रोही ठरत असून त्यांना तुरूंगात डांबलं पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केलीय. इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या वृत्तपत्रांनी राफेल व्यवहाराबाबत अनेक धक्कादायक खुलासे करून पंतप्रधान मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. एकूणच सध्या राफेलवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचा अर्थ काय, वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा अर्थ काय यासर्व घडामोडींचं विश्लेषण केलंय ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी. हे विश्लेषण पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

Updated : 12 Feb 2019 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top