Home > मॅक्स रिपोर्ट > मिशन धारावी सुरु : डॉक्टरांचं डोअर टू डोअर कॅम्पेन

मिशन धारावी सुरु : डॉक्टरांचं डोअर टू डोअर कॅम्पेन

मिशन धारावी सुरु : डॉक्टरांचं डोअर टू डोअर कॅम्पेन
X

धारावी मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचे ठिकाण, एके काळी हे ठिकाण आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखलं जायचं. आज या गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोना ने प्रवेश केल्यानं सरकार समोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशन आणि माहिम धारावी मेडिकल असोसिएशन म्हणजे खाजगी डॉक्टरांनी आपलं ‘मिशन धारावी’ सुरु केलं आहे. यामध्ये डॉक्टर धारावी मध्ये प्रत्येक डोअर टू डोअर जाऊन लोकांची तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी पीपीई कीट घालून तपासणी करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील आहेत. प्रत्येक घरातील व्यक्तीला बाहेर बोलावून त्यांची तपासणी केली जात आहे.

या संदर्भात डॉ. मनोज यांच्याशी आम्ही बातचित केली असता, त्यांनी ‘आम्ही सर्व प्रथम रुग्णांना त्यांची माहिती विचारतो, त्यांना ताप वैगरे आहे का? हे जाणून घेतो. जर आम्हाला काही शंका आली तर आम्ही त्यांना योग्य ठिकाणी उपचारासाठी पाठवतो. त्याला क्वारन्टाईन करुन त्याची योग्य ती तपासणी करतो.

आम्ही यामध्ये लोकांना त्यांनी कुठं कुठं प्रवास केला हे विचारतो, त्यानंतर ते कोणाच्या संपर्कात आले हे विचारतो. घरात कोणी आजारी आहे का? हे विचारतो. कुटुंबांची लहानांपासून मोठ्या पर्यंत स्क्रिनिंग करतोय. या ठिकाणी एका एका घरात 10-10 लोक राहतात. त्यामुळं तपासणी करणं गरजेचं आहे.’ असं डॉ. मनोज जैन यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितला.

Updated : 11 April 2020 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top