Home > मॅक्स रिपोर्ट > ‘मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाला विनंती’

‘मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाला विनंती’

‘मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाला विनंती’
X

सकल मराठा समाजाचे लक्ष लागलेला मराठा आरक्षणाचा अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाने मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे सुपुर्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करण्याची विनंती करतो. असं सुचक विधान केलं आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.

मागासवर्ग आयोगाच्या या अहवालावर आता सरकार अभ्यास करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहे. मराठा आरक्षण लागू न झाल्यास 25 नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. मी तुम्हा सर्वांना 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करण्याची विनंती करतो’, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Updated : 15 Nov 2018 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top