Home > News Update > आश्रमशाळेतल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आत्महत्या की हत्या?

आश्रमशाळेतल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आत्महत्या की हत्या?

आश्रमशाळेतल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आत्महत्या की हत्या?
X

पालघर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थ्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. पण या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील हिरवे पिंपळपाजा आश्रमशाळेत सुनिल चंदर खांडवी या १५ वर्षांच्या मुलाने मुलींच्या बाथरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

पण यामागे काहीतरी घातपात आहे असा संशय त्याच्या कुटुबियांना आहे. यागे कारण असं की रविवारी सकाळी सुनीलची आई त्याला भेटण्यासाठी आश्रमशाळेत गेली होती. त्या दिवशी सुनिलची भेट झाल्यानंतर त्याच्या आईनं त्याला सोबत येण्याचा आग्रह केला. पण येत्या आठवड्यात घरी येईन असं सांगत सुनिल आश्रमशाळेतच थांबला. त्यानंतर बैठकीसाठी निघून गेली. त्यानंतर थेट सोमवारी सकाळी शाळा भरल्यानंतर वसतीगृहातील मुली बाथरूमध्ये गेल्यानंतर त्यांना सुनील गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आणि हा प्रकार उघड झाला.

हे ही वाचा...

ही घटना समजल्यानंतर सुनिलचे कुटुंबिय शाळेत पोहचले. पण त्यावेळी सुनिलला आपण रविवारीच सुट्टी दिल्याचं मुख्यधापकांनी त्यांना सांगितले. यावरुनच त्याच्या कुटुंबियांचा संशय वाढला. मुख्यधापक खोटं बोलत असून तसेच आश्रमशाळा अधीक्षकांनी सुनीलच्या नावाची खोटी सही केलयाचा आरोप ते करतायत. हे प्रकरण आश्रमशाळेतर्फ दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुनिलच्या वडिलांनी केला आहे.

आताप्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केलाय. रविवारी सुनिलची आई त्याला आश्रमशाळेत भेटली पण मुख्याध्यापक म्हणतात त्याला रविवारीच सुट्टी दिली, त्यामुळे यात नक्कीच काहीतरी संशयास्पद असल्याचं दिसतंय. त्यामुळे पोलिसांनी यचा सखोल तपास करण्याची मागणी सुनिलचे कुटुंबिय करतायत.

याआधीही या आश्रमशाळेत गेल्या १० वर्षात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. एक विद्यार्थी पाण्यात पडल्याने तर दोन विद्यार्थ्यांचा विषबाधेनं मृत्यू झाला होता. पण या घटनेची ना चौकशी झाली ना त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे सुनिलच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करुन कुणी दोषी आढळल्यास कारवाईची गरज आहे.

Updated : 23 Jan 2020 5:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top