Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार – डॉ. अजित नवले

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार – डॉ. अजित नवले

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार – डॉ. अजित नवले
X

अवकाळी पावसामुळं पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून खरीप पिकांसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ८ हजार आणि फळबागांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर १८ हजार रूपयांची मदत आज राज्यपालांनी जाहीर केली आहे.

हे ही वाचा...

अवकाळी पावसाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या दुःखावर राज्यपालांची ८ हजारांची फुंकर

अवकाळी पावसाचा भाजी विक्रेत्यांना फटका

मुख्यमंत्र्यांनी घेतला अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा…

#शेतकरी_वाचवा अवकाळी पावसानं भिजलेली दिवाळी

या शेतकऱ्यांना राज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या जखमीवर हा मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले (ajit navale) यांनी केली आहे.

राज्यपालाने केलेल्या या घोषणेत शेती कर माफ करण्यात येणार असून नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालीन परिक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

मात्र, शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी नेत्यांनी ही मदत पुरेशी नसल्याचं म्हटलं आहे.

Updated : 17 Nov 2019 6:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top