Home > मॅक्स रिपोर्ट > …आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण?

…आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण?

…आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण?
X

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता धनगर, लिंगायत समाजाच्या मागणी बरोबरच ब्राह्मण समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ब्राह्मण समाजाची परिस्थिती वाईट असल्याचं सांगत ब्राह्मण समाजातील संघटनांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संघटना एकत्र आल्या असून ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी या पुढे लढा देणाऱा असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे.

दरम्यान जो समाज आरक्षण मागतो त्या समाजाचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवतो. त्यामुळे ब्राह्मण समाजाचा देखील अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवू असं, मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं आहे. त्यामुळे जर मागासवर्गीय आयोगाने ब्राह्मण समाज समाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे मान्य केल्यास ब्राह्मण समाजालाही आरक्षण मिळू शकते. मात्र, यासाठी मागासवर्गीय आयोगाने तशी शिफारस केली पाहिजे.

काय समस्या आहेत ?

ब्राह्मण समाजाकडे आता शेती राहिली नाही, त्यातच उच्च शिक्षण घेतलं तरी नोकरी मिळत नाही, आणि त्यातच नोकरी नसल्याने ब्राह्मण तरुणांचे लग्न जमत नाही. गावागावात अविवाहित आणि वय उलटून गेलेल्या युवकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील ब्राह्मण कुटुंबाची स्थिती हलाखीची आहे.

ब्राह्मण समाज हुशार असूनही ब्राह्मण युवक प्रवाहाबाहेर गेला आहे. समाजाची अधोगती रोखण्यासाठी ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे या मागणीसाठी समाज एकत्र येत आहे. एक चळवळ निर्माण होत आहे ब्राह्मण समाजातील सुस्थितीत असणाऱ्या कुटुंबानीही आपल्या बांधवांच्या मागणीसाठी या चळवळीत सहभाग नोंदवून दबावगट निर्माण करावा असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.

Updated : 2 Dec 2018 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top