Home > मॅक्स रिपोर्ट > भाजपाने लक्ष्मण जगतापांना का दाखवला ठेंगा?

भाजपाने लक्ष्मण जगतापांना का दाखवला ठेंगा?

भाजपाने लक्ष्मण जगतापांना का दाखवला ठेंगा?
X

भारतीय जनता पक्षाला अजित पवारांच्या गडामध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या आमदार लक्ष्मण जगतापांना मंत्रीपदापासून अखेर दूर ठेवण्यात आलं आहे. संघाचे निष्ठावंत आणि बुथप्रमुख म्हणून राजकीय सुरूवात करणाऱ्या संजय ( बाळा ) भेगडे यांची राज्यमंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पक्षात आलेल्या लक्ष्मण जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला पिंपरी-चिंचवड मध्ये मजबूत स्थान मिळवून दिलं.

मावळ लोकसभा मतदार संघात अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्या पराभवासाठीही लक्ष्मण जगताप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. यंदाच्या मंत्रीमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल आणि पुण्याच्या राजकारणात आपलं नेतृत्व पक्क होऊन जाईल असं लक्ष्मण जगताप यांना वाटत होतं, मात्र भारतीय जनता पक्षाने जगताप यांची स्वप्ने धुळीला मिळवली आहेत. पक्षाच्या निष्ठावंत भेगडे यांना मंत्रिपद देऊन पक्षाने भेगडे यांचं महत्व वाढवलं आहे.

Updated : 16 Jun 2019 7:32 AM GMT
Next Story
Share it
Top