Home > मॅक्स रिपोर्ट > कश्मीर पोलिसांनी लढवली अजब शक्कल…

कश्मीर पोलिसांनी लढवली अजब शक्कल…

कश्मीर पोलिसांनी लढवली अजब शक्कल…
X

पोलीस आरोपीला पकडण्यासाठी काय करतील? वेष बदलतील, पुरावे शोधतील जेणेकरुन आरोपीला रंगेहात पकडता येईल. पण कश्मीरमध्ये पोलीसाने चांगलीच शक्कल लढवून एका दगडफेकीला चिथावणी देणाऱया म्होरक्याला रंगेहात पकडले.

कश्मीरमध्ये अनेकदा चकमक, शोधमोहिमेदरम्यान पोलीसांवर दगडफेक केली जाते. आणि या दगडफेकीसाठी या माथेफिरु लोकांना पैसादेखील पुरवला जातो. यांना रंगेहात पकडता यावे यासाठी पोलीस आता त्यांच्यातलाच एक होऊन त्यांना पुराव्यानिशी पकडत आहेत. शुक्रवारी श्रीनगर येथे एक दगडफेकीची घटना झाली. तेव्हा या दगडफेकीत एका पोलीसाने वेषांतर करुन या दगडफेकीत सहभाग दर्शवला, व योग्य वेळ येताच या दगडफेकीतील म्होरक्याला अगदी पुराव्यासोबत ताब्यात घेतले.

Updated : 8 Sep 2018 10:23 AM GMT
Next Story
Share it
Top