Home > News Update > पुरग्रस्तांसाठी कर्नाटकाची मदत महाराष्ट्रापेक्षा अधिक

पुरग्रस्तांसाठी कर्नाटकाची मदत महाराष्ट्रापेक्षा अधिक

पुरग्रस्तांसाठी कर्नाटकाची मदत महाराष्ट्रापेक्षा अधिक
X

महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्य सध्या भयंकर पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत. दोन्ही राज्यांच्या सरकारने आपापल्या राज्यातल्या पुरबाधित लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आर्थिक मदत, अनुदान या स्वरुपात राज्य सरकार आपल्या नागरिकांना मदत करत आहे. मात्र, कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने आपला हात आखडता घेतल्याचं दिसतंय.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीत खूप मोठा फरक आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असूनही हा फरक पाहायला मिळतोय. कर्नाटक सरकारने घर बांधणीसाठी ५ लाख रुपये दिले आहेत तर राज्य सरकारने १ लाख दिलेत. घरांच्या दुरुस्तीसाठी कर्नाटक सरकार १ लाख रुपये देत आहे तर महाराष्ट्र सरकार केवळ १० हजार देतंय. पुरग्रस्तांना घरभाड्च्या स्वरुपात कर्नाटक सरकार ५ हजार देतंय तर राज्य सरकार केवळ ८४० रुपये देतंय. यासोबतच जनावरांच्या मृत्यूसाठीही कर्नाटक सरकारची नुकसानभरपाई महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची पुरग्रस्तांना देऊ केलेली ही मदत पुरेल कशी या पेचात पूरग्रस्त पडलेत.

दोन सरकार कोणाची कामगिरी दमदार?

महाराष्ट्र कर्नाटक

घर दुरुस्ती - १० हजार १ लाख

घरबांधणी - १ लाख ५ लाख

पूरग्रस्तांना भाडे

(दरमहा) - ८४० रु. ५ हजार

जनावारे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांचीही जास्त भरपाई.

Updated : 16 Aug 2019 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top