Home > News Update > कर्नाटकाचा आज ‘फैसला’

कर्नाटकाचा आज ‘फैसला’

कर्नाटकाचा आज ‘फैसला’
X

कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा आज फैसला होणार आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना दुपारी दीड पर्यंत सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर सभागृहात मतदान घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या 100 आमदारांनी कर्नाटक विधानसौंदा मध्ये गुरूवारी रात्री पासून आंदोलन सुरू केलं आहे. भाजपाच्या आमदारांनी रात्रभर विधानसौंदातच ठिय्या दिला. काही आमदार रात्रभर तिथेच झोपले.

कर्नाटकात गेले काही दिवस हायपॉवर ड्रामा सुरू आहे. कसं ही करून कर्नाटकची सत्ता मिळवायचा चंग भाजपाने बांधला आहे. काँग्रेस आणि जनता दलाच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतरही अध्यक्ष पक्षपाती वागून सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Updated : 19 July 2019 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top