Home > मॅक्स रिपोर्ट > तिला तिच्या चांगल्या कामासाठी मिळाली ’३८ वर्षाची शिक्षा’

तिला तिच्या चांगल्या कामासाठी मिळाली ’३८ वर्षाची शिक्षा’

तिला तिच्या चांगल्या कामासाठी मिळाली ’३८ वर्षाची शिक्षा’
X

इराणमध्ये मानवाधिकारासाठी लढणाऱ्या वकील नसरीन सोतोदेला ३८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिवाय तिला १४८ चाबकाचे फटके देण्यात यावेत असे आदेश देण्यात आलेत. तेहरानमधल्या न्यायालयानं हा निवाडा केला आहे.

इराणचा दिग्दर्शक जाफर पहानीच्या टॅक्सी तेहरान (२०१५) सिनेमात नसरीन शेवटची दिसली होती. त्या सीनमध्ये ती इराणमध्ये मानवाधिकाराबद्दल बोलणं कसा देशद्रोह आहे आणि आपण कसे देशद्रोही बनलोय, हे पनाहीला सांगत असल्याचा हा सीन आहे.

नसरीन गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधल्या महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवतेय. इराणच्या महिलांना बुरख्यातून मुक्तता मिळावी अशी मागणी नसरीन अनेक वर्षांपासून करत आहे. त्यासाठी तिनं रस्त्यावर उतरुन आंदोलनही केलं होतं. हे आंदोलन चिरडण्यात आलं.

iranian-human-rights-lawyer-nasrin-sotoudeh-arrested

२०१० मध्ये नसरीनला पहिल्यांदा देश विघातक कारवायांसाठी अटक करण्यात आली. तिला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. इराण विरोधात हेरगिरी करणं, देशाची बदनामी करणं, देशातल्या नेत्यांविरोधात कारवाया करण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. नसरीनची वकीली सनद रद्द करण्यात आलीय.

Amnesty International नं नसरीनला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा निषेध केलाय. ही शिक्षा लगेच रद्द करावी अशी मागणी करण्यात आलीय.

इराणमधल्या न्यूज एजन्सी नसरीनला झालेली शिक्षा ही फक्त सात वर्षांची असल्याचा दावा करत आहेत. हा दावा कसा फोल आहे हे सांगण्यासाठी नसरीनचा पती रेझा खानदाननं तिचं पत्र शुक्रवारी म्हणजे काल रात्री उशिरा फेसबुकवर जारी केलं आहे. यात नसरीनचा झालेली अटक आणि शिक्षेचे तपशील आहेत.

एकूणच काय तर इराणंमध्ये मानवाधिकाराचं काहीही खरं नाही.

[button color="" size="" type="square" target="" link=""] नरेंद्र बंडबे यांच्या फेसबुकवरुन साभार[/button]

Updated : 30 March 2019 3:47 PM GMT
Next Story
Share it
Top