Home > मॅक्स किसान > मोबाईल बॅटरीवर केली दुष्काळी गावांची पाहणी...

मोबाईल बॅटरीवर केली दुष्काळी गावांची पाहणी...

मोबाईल बॅटरीवर केली दुष्काळी गावांची पाहणी...
X

दुष्काळी भागाची पाहणी साठी आलेल्या केंद्रीय दक्षता समितीनं रात्री मोबाईल बॅटरीवर केली दुष्काळी गावांची पाहणी.

उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या सहा केंद्रीय सदस्य समितीन जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पारोळा, अमळनेर तालुक्यात पाहणी केली. काल औरंगाबाद येथून पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय दुष्काळ समितीला उशीर झाल्याने रात्री मोबाईल च्या बॅटरीवर पाहणी केली.केंद्रीय पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पथक येणार म्हणून जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावातील शेतकरी वाट पाहत होती. मात्र जामनेर तालुक्यात पथक उशिरा आल्यानं अंधार झाल्यानं घाईत दौरा झाला .अंधारातच शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यानं हात ची पीक गेली, जनावरांना चारा नाही की पिण्याला पाणी नाही अशी आपबीती केंद्रीय समिती समोर सांगितली . कर्ज माफीचे पैसे तसच पीक विम्याचेही पैसे मिळाले नाही अशी गाऱ्हाणीही शेतकऱ्यांनी समिती समोर सांगितल्या अमळनेर अमळनेर तालुक्यातील शेकडो जनावरे चारा तसच पाण्या अभावी विकावी लागली , असही समिती समोर शेतकऱ्यांनी सांगितलं, अमळनेर तालुक्यात सलग चार वर्षे पाऊसान पाठ फिरवल्याने गंभीर परिस्थिती उभी राहिली दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवतेय.ह्या वर्षी तर शेतकरी तसच शेतमजुरांना कामच नसल्याने गावं सोडून मजुरीसाठी इतर ठिकाणी स्थलांतर व्हावं लागलं असही दुष्काळ केंद्रीय समिती समोर सांगितलं. दुष्काळासाठी केंद्र सरकार कडून काही तरी मदत करा अशी विनवणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. अमळनेर तालुक्यातील वाघोदा, पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हान या गावांना दुष्काळ केंद्रीय समितीनं भेटी दिल्या.

दरम्यान दुष्काळाची खरी मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात.

https://youtu.be/iNb5hN82FJk

Updated : 6 Dec 2018 4:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top