News Update
Home > News Update > आज इंडिया आणि अफगाणिस्तान क्रिकेट सामना रंगणार

आज इंडिया आणि अफगाणिस्तान क्रिकेट सामना रंगणार

आज इंडिया आणि अफगाणिस्तान क्रिकेट सामना रंगणार
X

भारतीय संघाची आज वन-डे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध लढत रंगणार आहे. या वर्ल्डकपमधील पाचही लढती गमावणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी कामगिरी करण्याची संधी भारताला आहे. भारतीय फलंदाजही कमकुवत असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याचा निश्चित प्रयत्न करतील.

सध्या अफगाणिस्तान संघ प्रचंड दडपणात आहे. या संघाला ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवून नेट रन-रेट वाढविण्याचा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रयत्न असेल.भारतीय फलंदाजही प्रथम फलंदाजी आलीच, तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. कारण, भारताची खोलवर फलंदाजी असून,आघाडीचे फलंदाज चांगले फॉर्मात आहेत.

Updated : 22 Jun 2019 6:15 AM GMT
Next Story
Share it
Top