Home > मॅक्स रिपोर्ट > पहिल्या एकदिवासीय सामन्यात भारताकडून वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

पहिल्या एकदिवासीय सामन्यात भारताकडून वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

पहिल्या एकदिवासीय सामन्यात भारताकडून वेस्ट इंडिजचा दारुण पराभव
X

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिज फलंदाजी करत ३२२ धावांचे लक्ष भारतासमोर ठेवले . वेस्ट इंडिजचा शिमरोन हेतमेयर (१०६) आणि कायरेन पॉवेल (५१) यांनी सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक चहल ने ४१ धाव देऊन ३ बळी घेतले. वेस्ट इंडिजच्या ३२२ धावांचा पाठलाग करताना विराट व रोहित यांचा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २४६ धावांची भागीदारी केली. विराटने १०७ चेंडूंत २१ चौकार आणि २ षटकार खेचून १४० धावांची खेळी केली. रोहितने ११७ चेंडूंत १५ चौकार व ८ षटकार खेचून नाबाद १५२ धावांची खेळी केली करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. भारताने हे लक्ष्य ४२.१ षटकांत सहज पार केले.

https://twitter.com/BCCI/status/1054029583899537408

आजचा सामन्यातील वैशिष्टये :

१) २०१५ नंतर १७ सामन्यांत विंडीज संघाला प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्यांदाच तीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला आहे.

२) रोहित शर्माचे एकदिवसीय सामन्यातील आजचे २० वे शतक ठरले .

३) विराट कोहलीचे वन डेतील ३६ वे शतक ठरले.२०४ सामन्यांत ३६ शतकं पूर्ण करत त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकले. सोबतचं या शतकी खेळीनंतर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६० शतकं झळकावण्याचा पराक्रम केला.

४) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कॅप देऊन आजचा सामन्यात रिषभ पंतचे पदार्पण झाले.

Updated : 21 Oct 2018 4:15 PM GMT
Next Story
Share it
Top