Home > मॅक्स रिपोर्ट > IAS अधिकारी सरकारवर नाराज

IAS अधिकारी सरकारवर नाराज

IAS अधिकारी सरकारवर नाराज
X

सिताराम कुंटे, वंदना कृष्णा, मुकेश खुल्लर, व्ही. गिरीराज, संजय भाटीया, अरविंद कुमार, कविता गुप्ता, शामलाल गोयल, उज्ज्वल उके ही नावं १९८५ च्या बॅच मधल्या आयएएस अधिकाऱ्यांची...या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या चांगलाच असंतोष पसरल्याची माहिती मिळतेय. त्याच कारण आहे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना देण्यात आलेली मुदतवाढ आणि प्रविण परदेशी यांना मिळालेली पदोन्नती.

स्वाधीन क्षत्रिय ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होणार होते. पण, फडणवीस सरकारनं त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी आणखी वाढवला आहे. सुमित मलिक या मागासवर्गीय अधिकाऱ्याची या पदी वर्णी लागू नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्याची मंत्रालय वतृळात चर्चा आहे.

आता मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळाल्यामुळे सध्या प्रधान सचिव दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव या पदोन्नतीला मुकावं लागणार आहे. त्यामुळे वरील सर्व अधिकाऱ्यांच्या बढतीवर गदा येणार आहे. त्यातच १९८५ च्या बॅच मधल्या एकट्या प्रविण परदेशी यांना सरकारनं अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिलीय. त्यामुळे या बॅचच्या अधिकाऱ्यांची नाराजी आणखी वाढलीय. शिवाय आता याच बॅचमधले व्ही. गिरीराज हे या वर्षी ऑगस्टमध्ये तर उज्ज्वल उके हे डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांना पदोन्नती मिळणार नाही जवळपास नक्की आहे.

याबबातच वृत्त काही दिवसांपूर्वीच एका इंग्रजी वृत्तपत्रात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १९८५ च्या बॅचमधल्या सर्व अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचं आश्वासन दिलं. पण फेब्रुवारीचा पहिला आठवडा उलटून गेला तरी अद्याप कागदी घोडे थंडच आहेत.

कार्यशैलीमुळेच क्षत्रिय यांना मुदतवाढ ?

स्वाधीन क्षत्रिय हे ‘होयबा’ अधिकारी म्हणून ओखले जातात. सरकारच्या कुठाल्याही प्रस्तावाला कधीही ते नाही म्हणत नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्वाधीन क्षत्रिय यांना कोणतीही विशेष चमकादार किंवा दखल घेण्यासारखी कामगिरी करता आलेली नाही. त्यातच फाईलींवर बसून राहणारा तसंच कुठलही काम न करणारा सचिव असा आरोप सध्या त्यांच्यावर केला जात आहे.

Updated : 7 Feb 2017 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top