Home > मॅक्स रिपोर्ट > होमिओपॅथीक रूग्णालयातील सुविधांचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा - राम नाईक

होमिओपॅथीक रूग्णालयातील सुविधांचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा - राम नाईक

होमिओपॅथीक रूग्णालयातील सुविधांचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा - राम नाईक
X

डॉ.एम.एल.ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या ग्रामीण होमिओपॅथीक रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या विविध पाच रूग्ण सुविधांचा परिसरातील नागरीकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले.

माजी राज्यपाल प्रा.राम कापसे यांच्या तृतीय पुण्यतिथीचे औचित्य साधून या रूग्णालयातील प्रा.राम कापसे ज्येष्ठ नागरीक शुश्रूषा केंद्र, डायलिसिस केंद्र, सौरऊर्जा निर्मिती संयंत्र, कान-नाक-घसा विभाग आणि जीश जर्नल ऑफ इंटीग्रेटेड स्टँडर्डाइज्ड होमिओपॅथी या ई-जर्नलचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे आदी यावेळी उपस्थित होते.

एकाच दिवशी पाच विविध रूग्ण सुविधा उपलब्ध करून देणारे हे रूग्णालय पश्चिम भारतातील सर्वाधिक नावारूपाला आलेले रूग्णालय आहे. येथील सुविधांचा सर्वसामान्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. या रूग्णालयाच्या भूमीपुजनापासून प्रत्येक टप्प्यावर मी सहभागी झालो असल्याने त्याच्या प्रगतीचा मला अभिमान आहे. येथील विविध रूग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणाऱ्या देणगीदारांचे ही नाईक यांनी आभार मानले

खासदार श्री.गावित यांनी रूग्णालय सामाजिक बांधिलकी जपून गरीब रूग्णांना माफक दरात विविध सेवा उपलब्ध करून देत असल्याबद्दल कौतुकोद्गार काढले. देणगीदारांचे कौतुक करून या रूग्णालयासाठी लागेल ती मदत करू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रूग्णालयातील सुविधांसाठी देणगी देणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वस्त सर्वश्री कुमार ढवळे, आनंद कापसे यांच्यासह रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 1 Oct 2018 11:40 AM GMT
Next Story
Share it
Top