Home > News Update > VIDEO : पुणे औधमध्ये पावसाचा कहर, स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत

VIDEO : पुणे औधमध्ये पावसाचा कहर, स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत

VIDEO :  पुणे  औधमध्ये पावसाचा कहर, स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत
X

मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकांनी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने 250 -300 कुटंबियांचे स्थलांतर पुणे महानगर पालिकेच्या इंदीरा गांधी या स्थानिक शाळेत करण्यात आले आहे. NGO तसेच इतर संघटनांनी मिळून स्थानिक लोकांना पुरेसे अन्न व कपड्यांची सोय करुन दिली आहे. या पूरजन्य स्थितीमध्ये स्थानिक लोकांच्या दैनंदीन काही वस्तू अस्थाव्यस्त झाल्या आहेत तर काही जीवनावश्यक वस्तू वाहुन गेल्या आहेत. यामुळे लोकांना फार त्रास सहन कराव लागतोय.

कुठे रहायचं? काय खायचं? हा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. तसेच या परिसरात रोगराई पसरण्याची संभाव्यता आहे.

डेंग्यू, मलेरीया रोगांची लागण होऊ नये म्हणून व या गंभीर परिस्थितीतुन लोकांना पुर्वस्थितीवर आणण्याचा. स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या आढव्यानुसार, औंध गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काल मध्यरात्री नदीचे पाणी वाढले आणि हे पाणी नदीचे पात्र ओलांडून आजुबाजुच्या वस्तीमध्ये शिरले. यामुळे स्थानिक लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

Updated : 6 Aug 2019 3:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top