Home > मॅक्स रिपोर्ट > ग्राऊंड रिपोर्ट : माहीम वस्ती रिपोर्ट

ग्राऊंड रिपोर्ट : माहीम वस्ती रिपोर्ट

ग्राऊंड रिपोर्ट : माहीम वस्ती रिपोर्ट
X

मुंबईतील पांढरपेशा समाजापासून फटकून राहिलेली झोपडपट्टी म्हणजे माहीममधील रेल्वेच्या अंतर्गत असलेली वस्ती. ही झोपडपट्टी पश्चिम रेल्वेला अगदी लागून आहे. दररोज लाखो मुंबईकर लोकलमधून या वस्तीकडे पाहत असतील. पण इथल्या वास्तवापासून ते कोसो दूर आहेत.

copyright-maxmaharashtra

४० वर्षांपूर्वी एक-एक झोपडी करत ही वस्ती तयार झाली. आता इथं जवळपास ४ हजारांहून अधिक लोक राहतात. अनेक जाती धर्माचे लोकं या वस्तीत राहत आहेत. मुंबईमध्ये अनेकठिकाणी जशी अनधिकृत बांधकामं आहेत, तशीच ही वस्ती देखील आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत हजारो लोकांचा संसार सुरू आहे. रेल्वेने या लोकांना अनेकवेळा नोटीसा दिल्या. मात्र, इथल्या स्थानिक राजकारणामुळे परिस्थिती जैसे थे आहे. मुंबईमध्ये अश्या अनेक झोपडपट्टी आहेत जिथे अजूनही नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाही. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा मुंबईसारखं सुधारलेलं दिसत नाही. या वस्त्या मुंबईत बरोबर मुंबई उपगनगरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मुंबईमध्ये जे लहान लहान व्यवसाय इ वस्तीमधूनच जन्माला येतात. येथील लोकवस्ती फक्त मराठी लोकांची नसून देशातील विविध राज्यातून लोकं राहत असतात. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की

अनेक वर्ष आम्ही इथे राहतो त्यावेळी फक्त येण्याची आणि जाण्याची २ लाईन वेस्टर्न रेल्वेला होत्या मात्र याला हार्बर लाईन देखील वाढवल्यामुळे आम्ही या हद्दीतून दूर झालो आहोत. आम्ही अनेक वर्ष राहत असलो मात्र रेल्वेची ही हद्द काही वर्षांपूर्वी वाढवलेली आहे. त्यामुळे आम्ह्यला या सर्व त्रासाला सामोरे जावे लागते.

copyright-maxmaharashtra

या वस्तीतल्या अस्वच्छतेमुळे सार्वजनिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. इथे असलेल्या अस्वच्छतेमुळे आजूबाजूच्या झोपडपट्टीतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या वस्तीमध्ये केवळ ४-५ प्रसाधनगृह आहेत. त्यामुळे येथील लोकांना उघड्यावरती स्वच्छालयास जावं लागतं. शौचालयांचे काम मुंबई शहरात सुरू आहे. मात्र अशा अनेक झोपड्पट्टी भागात उणिवा दिसून येतात.

copyright-maxmaharashtra

copyright-maxmaharashtra

महानगर पालिकेचे सफाई कामगार येतात. मात्र ते थातुरमातुर सफाई करून निघून जातात असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. या भागात सातत्याने अस्वच्छता असल्यामुळे दुर्गंधी -रोगराईचा त्रास या वस्तीतील लोंकाना होतो. रेल्वे ट्रॅक जवळ असल्यामुळे रहदारीसाठी इथल्या लोकांना पटरीमधूनच ये-जा करावी लागते.

copyright-maxmaharashtra

यामध्ये अनेक लोकांचा अपघात झाला आहे. त्यामुळे एक पादचारी पूल रेल्वे प्रशाशनाने करून देण्याची मागणी या लोकांची आहे. यावरती मॅक्समहाराष्ट्रचा खास रिपोर्ट पाहा...

Updated : 14 Nov 2019 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top