Home > मॅक्स रिपोर्ट > सरकार ठगबाजी करतंय - राधाकृष्ण विखे पाटील

सरकार ठगबाजी करतंय - राधाकृष्ण विखे पाटील

सरकार ठगबाजी करतंय - राधाकृष्ण विखे पाटील
X

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सरकार ठगबाजी करत असल्याची सडकून टीका केली.

या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार कपिल यांच्यासह विरोधी पक्षाचे आदी नेते उपस्थित होते.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

सरकारच्या ठगबाजीवर अधिवेशनात बोलणार

१६ हजार गावं दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त केल्याची घोषणा केली, पण या सगळ्या गावांचा दुष्काळी यादीत समावेश आहे

दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना अजून मिळायचे आहेत आणि क्रांती घडवून आणल्याच्या बाता मारतात, ही ठगबाजी आहे.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय, दुष्काळ गंभीर झाला असताना सरकार निकष आणि अटी घालतंय.

शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, खरीपाचं कर्ज माफ करावं, फळबागांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी.

मुंबईतील जनजीवन सुरळीत करता येत नाही तर अयोध्येला जाऊन काय करणार, निवडणुकाजवळ आल्यानंतर राम मंदिर आठवलं, चार वर्षांत बाळासाहेबांचे स्मारक बांधता आले नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2239364439617081/

Updated : 18 Nov 2018 11:18 AM GMT
Next Story
Share it
Top