Home > मॅक्स किसान > उसाच्या मळ्यात दुधी भोपळ्याचे पीक घेऊन महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न

उसाच्या मळ्यात दुधी भोपळ्याचे पीक घेऊन महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न

उसाच्या मळ्यात दुधी भोपळ्याचे पीक घेऊन महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न
X

कऱ्हाड तालुक्यातील साजूर गावाला उसाचा पीक जास्त प्रमाणात असला तरी येथील देवीदास चव्हाण या शेतकऱ्याने धाडसाने वेगवेगळी पिके घेण्यास सुरुवात केली. आता तर या शेतकऱ्याने दुधी भोपळा या वेलीवरच्या पिकाची लागवड केली आहे. येत्या महिनाभरात उत्पादन सुरू होऊन दर मिळाला तर महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे असं ते म्हटले. ह्या गावामध्ये पाहावे तिकडे ऊसच ऊस; पण याच गावातील एक शेतकरी देवीदास चव्हाण हे आपल्या जिद्दीच्या जोरावर धाडस करून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळी बागायती पिके घेऊन लाखो रुपये कमवत आहेत.

सध्या या शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या पाठबळावर दुधी भोपळा या वेलीवरच्या पिकाची लागण केली आहे. येत्या महिनाभरात दुधी भोपळ्यातून उत्पन्न येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या पिकामुळे दर महिन्यास सुमारे दोन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

देवीदास चव्हाण यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले आहे. वडिलानंतर देवीदास यांनी शेतीत पाऊल टाकल्यावर गेली २२ वर्षे मागे वळून न पाहता आपली घोडदौड चालू ठेवली आहे. सकाळी पहाटे उठून शेतात जायचे ते संध्याकाळी दिवस मावळला की शेत सोडायचे. कधी-कधी सणवार, गावातील उत्सव किंवा लग्न या कार्यक्रमांकडे पाठ फिरविली; पण शेतीकडे लक्ष दिले. आतापर्यंत अपार कष्ट केले. तसेच पिकांसाठी ठिबक सिंचन करून त्या जोरावर या दोघांनी टोमॅटो, मलची मिरची, बिनीज काकडी, ब्रोकली आदी नावीन्यपूर्ण बागायती पिके घेऊन लाखो रुपये कमविले आहेत.मागणी वाढली तर दुधी भोपळ्यापासून सहा महिन्यांत पाच लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

Updated : 13 Oct 2018 9:30 AM GMT
Next Story
Share it
Top