Home > मॅक्स रिपोर्ट > विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन
X

कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे आज निधन झाले. काही दिवसांपासून त्यांना किडणीचा त्रास होता. सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कारकीर्द...

जन्म १ सप्टेंबर १९३५

१९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर त्यांनी प्रतिनिधीत्व केले.

१९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे त्यांचे पुत्र होत.

दरम्यान शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं असून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी ते एक निगर्वी, संयमी आणि मृदभाषी नेते होते. विचारधारेशी एकनिष्ठता आणि सार्वजनिक समस्यांबाबत संवेदनशीलता हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विशेष पैलू होते. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी दीर्घकाळ जनतेचे प्रतिनिधीत्व केले. एक शासकीय कर्मचारी ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व राज्याचे मंत्री, अशी त्यांची कारकिर्द प्रेरणादायी आणि सामाजिक, शैक्षणिक, कृषी व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान कायम स्मरणात राहिल, या शब्दांत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Updated : 14 Jan 2019 3:49 PM GMT
Next Story
Share it
Top