Home > मॅक्स रिपोर्ट > मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी त्यांचं कुटुंब पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी त्यांचं कुटुंब पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी त्यांचं कुटुंब पोलिसांच्या ताब्यात
X

मंत्रालयात विष पिऊन जीवनयात्रा संपवलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली पोलिसांनी सकाळपासून ताब्यात घेतलं आहे. आज धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौऱा असल्यामुळे दोंडाई पोलीस स्टेशमध्ये धर्मा पाटील यांच्या मुलाला आई पत्नीला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोंडाईचा येथे नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याप्रसंगी विखरण येथील नरेंद्र पाटील आणि त्यांच्या मातोश्री सखुबाई पाटील हे आंदोलन करणार होते. नरेंद्र पाटील यांचे वडील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वडिलांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच न्याय मिळावा यामागणीसाठी ते आज आंदोलन करणार होते मात्र तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाचा धसका घेतला असून ही एक प्रकारे अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी असल्याची चर्चा केली जात आहे.

Updated : 26 Dec 2018 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top