Home > मॅक्स किसान > अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका

अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका

अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका
X

यंदा पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीला मोठा फटका बसला. सांगली जिल्हा हा प्रामुख्याने द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा निसर्गाने दगा दिल्याने सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा या वर्षीचा द्राक्ष हंगाम लांबला आहे.

या वर्षीचा हंगाम तब्बल दीड ते दोन महिने उशिराने सुरू होणार आहे. त्यामुळे हजारो कोटींचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सांगलीची ‘अवीट गोडी जीभेला सुंदर चवीचा आनंद देणारी द्राक्षं’ डिसेंबर महिना संपला की बाजारात येतात. मात्र, यंदा डिसेंबर महिना संपला तरी अजुनही द्राक्ष बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे फेब्रुवारी च्य़ा पहिल्या आठवड्यात ही दाक्षं बाजारात येतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सागर आर्वे या शेतकऱ्यांशी आम्ही या संदर्भात बातचित केली असता, त्यांनी अवकाळी पाऊस हा यापूर्वी आठ दिवसाच्या अंतराने पडायचा. मात्र, यंदा अवकाळी पाऊस सलग पडत राहीला. त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी आणि अन्य शेतीची कामं करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे बागेचे नियोजन चुकलं. ऑगस्ट महिन्यात अवकाळीमुळे 85 टक्के नुकसान झालं होतं तर आत्ता 10 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस ढगाळ वातावरण आणि धुकं याचा परिणाम द्राक्ष बागांच्या वर झाला. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या छाटण्या ऑक्‍टोबरच्या शेवटपर्यंत सुरू होत्या. नेहमीप्रमाणे अरली छाटलेल्या बागा रोगाच्या तडाकयात सापडल्या. त्यामुळे त्यांचा दर्जा घसरला आणि मागणी ही अपेक्षित राहिली नाही.

आत्ता जवळपास 70 ते 75 टक्के बागांचे नुकसान झालं आहे. सरासरी बघितलं तर या भागात दरवर्षी पंधरा लाख टन द्राक्षाचे उत्पादन निघतं. त्य़ामुळे सात ते आठ लाख टन द्राक्षाचे उत्पादन होणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. छाटणी लांबली, औषधांचा जास्त वापर करावा लागला. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बाजारातील द्राक्षं ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

हंगाम लांबल्यामुळे या वर्षी आंबा आणि द्राक्षं एकाच वेळी बाजारात येणार आहेत. त्यामुळे हंगामात उत्पन्न कमी असून चांगला दर मिळेल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एकाच वेळी द्राक्ष आणि बेदाणा हंगाम सुरू होत असल्यामुळं सगळं गणित दरावर अवलंबून आहे. मार्केटिंगसाठी माल कमी दर्जाचा असेल तर तो, बेदाणा निर्मिती कडे जाण्याची शक्यता आहे.

बाजारात द्राक्ष उपलब्ध नसल्यानं मागणीही नाही. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात एकदम द्राक्षं बाजारात येतील. त्यामुळं द्राक्षांची दर काय होईल? हा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न सतावत आहे.

Updated : 17 Jan 2020 4:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top