Top
Home > Fact Check > Fact Check : मोदी फूट पाडणारे नेते म्हणणारा लेखक खरंच पाकिस्तानचा आहे का?

Fact Check : 'मोदी फूट पाडणारे नेते' म्हणणारा लेखक खरंच पाकिस्तानचा आहे का?

Fact Check : मोदी फूट पाडणारे नेते म्हणणारा लेखक खरंच पाकिस्तानचा आहे का?
X

टाइम’ या जग प्रसिद्ध नियतकालिकाच्या कवर पेजवर मोदी तिसऱ्यांदा झळकले आहेत. ‘टाइम’ नियतकालीकाने 2012, 2015 आणि 2019 ला मोदींना कवर पेजवर जागा दिली आहे. 2012 ला गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी टाइम मॅगजीनच्या कव्हरवर झळकले होते. तेव्हा या कव्हर स्टोरीचे नाव होते 'मोदी मिन्स बिजनेस, बट कॅन ही लीड इंडिया.' त्यानंतर मोदी पंतप्रधान झाले. 2015 ला टाईमने कवर पेजवर मोदींना स्थान दिले. तेव्हा शीर्षक होतं. 'व्हाय मोदी मॅटर्स... कॅन ही डिलिव्हर'? असा प्रश्न विचारला गेला होता. आता ‘टाइम’ने 2019 च्या मे महिन्याच्या कवर पेजवर मोदींना तिसऱ्यांदा स्थान दिले आहे. मात्र, -‘India’s Divider In Chief’ म्हणजेच फूट पाडणारे नेते असं म्हटलं आहे.

या लेखानंतर जगभरातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपली मत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे 2015 ला मोदींना ‘टाईम’ नियतकालीकाने स्थान दिल्यानंतर मोदींची वाहवा करणारे लोक आता या लेखावर टीका करताना दिसत आहेत. तर मोदी विरोधक या लेखाचा निवड़णुकीत वापर करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

दरम्यान हा लेख ज्या पत्रकाराने लिहिला आहे. त्या पत्रकाराचे नाव आतिश तासीर असे असून या पत्रकाराबाबत भारतीयांच्या मनात राग निर्माण व्हावा म्हणून विकिपीडिया वरुन या पत्रकारांबाबतची माहिती बदलण्यात आल्याचं समोर आलं आहे. आतिश तासिर यांना विकिपीडियावर पाकिस्तानी दाखवण्यात आलं असून

‘एका पाकिस्तानी पत्रकाराकडून आणखी काय अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात असा प्रश्न विचारला जात आहे’.

या संदर्भात आल्ट न्यूजने वृत्त प्रसारीत केले असून आतिश तासीर यांच्या विकिपीडियावरील माहितीमध्ये 10 मे ला अनेक वेळा बदल करण्यात आला आहे.

विकिपीडियाच्या माहितीमध्ये पहिल्यांदा आतिश तासीर यांच्या नावामध्ये 7:59 वाजता बदल करण्यात आला होता. तेव्हा त्यांना कॉंग्रेसचा पीआर मॅनेजर असल्याचं या ठिकाणी संपादित करण्यात आलं. (एडीट करण्यात आलं.)आता हे कोणी केलं वेगळं सांगायला नको.

आतिश तासीर यांच्या नावात कसा बदल करण्यात आला खालील लिंकवर क्लीक करा

आतीश तासीर विकिपीडिया

विकिपीडियाच्या माहितीत कसा बदल केला जातो, हे जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

विकिपीडियाच्या माहितीत कसा बदल कराल?

टाईम नियतकालिकाबाबत थोडंसं...

टाईम नियतकालीक हे अमेरिकेतून प्रसिद्ध होणारं जगातील एक प्रतिष्ठित मासिक मानलं जातं. या मासिकचा खप 20 लाख प्रतींपेक्षा जास्त आहे..

Updated : 11 May 2019 9:41 AM GMT
Next Story
Share it
Top