Home > मॅक्स रिपोर्ट > एल्गार परिषद प्रकरण: पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद...

एल्गार परिषद प्रकरण: पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद...

एल्गार परिषद प्रकरण: पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद...
X

पुण्यात नक्षलवादी कनेक्शन आणि त्याला फंडिंग करण्याच्या आरोपावरून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्याबाबत आज सर्वोच्च न्यायलायाने त्यांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यास सांगितले आहे.

31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतरच्या दुसर्या दिवशी भीमा – कोरेगाव येथे दंगल पेटली. या परिषदेतील नक्षलवाद्यांचा सहभाग आणि शहरी माओवाद्यांकडून आर्थिक मदत केली गेली या आरोपाखाली पोलीसांनी मुंबई, ठाणे, हैदराबाद, फरिदाबाद, दिल्लीत छापे टाकले. यामध्ये तेलगू कवी वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, व्हरगॉन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली. तुर्तास न्यायालयाने या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र या पाच जणांच्या अटकेची परवानगी न मिळाल्यानं पुणे पोलिसांच्या हाती निराशा लागली आहे.

Updated : 6 Sep 2018 11:54 AM GMT
Next Story
Share it
Top