Home > मॅक्स रिपोर्ट > सैनिकांचा प्रचारासाठी वापर करू नका – केंद्रीय निवडणूक आयोग

सैनिकांचा प्रचारासाठी वापर करू नका – केंद्रीय निवडणूक आयोग

सैनिकांचा प्रचारासाठी वापर करू नका – केंद्रीय निवडणूक आयोग
X

सैनिकांच्या छायाचित्रांचा आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षांनी वापर करू नये, अशा मार्गदर्शक सुचनाच केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातल्या राजकीय पक्षांना दिल्या आहेत.

काही राजकीय पक्षांनी सैन्यातील सैनिकांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयोगानं या सूचना दिल्या आहेत. या छायाचित्रांचा वापर राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी राजकीय फायद्यासाठी जाहिरातीमध्ये केल्याचं निदर्शनास आल्याचं आयोगानं म्हटलंय.

सैन्य दलातील प्रमुखांसह, सैनिकांच्या छायाचित्रांचा वापर राजकीय पक्षांनी, त्यांच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारात, सभांमध्ये, जाहिरातींमध्ये, फलकांवर कुठंही वापर करू नये.

सैन्य हे कुठल्याही राजकारणापासून अलिप्त असून देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा आशयाचं पत्रच केंद्रीय निवडणूक आयोगानं ४ डिसेंबर २०१३ मध्ये सर्व राजकीय पक्षांना पाठवलं होतं. त्याचा संदर्भ आयोगानं देत या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या फलकांवर पायलट अभिनंदन यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो झळकले होते.

Updated : 9 March 2019 5:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top