‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी’ जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक नगरी चोपडा शहरात जिल्हास्तरीय  ‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन दिनांक नऊ आणि दहा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

चोपडा शहरात प्रथमच होत असलेल्या, जिल्हास्तरीय संमेलन २०१९ चा उद्घाटन सोहळा सकाळी १०:०० वाजता माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल तसेट उद्घाटन सोहळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. विविध साहित्यिक व सांस्कृतिक
कार्यक्रमांचे नियोजन या संमेलनात करण्यात आले आहे.

दरम्यान, होणाऱ्या ग्रंथदिंडीत तसेच महिला मंडळ माध्यमिक शाळेच्या प्रांगणावरील ‘स्व. डॅा. सौ. सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’ तील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात रसिक श्रोते, नाट्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी केले आहे