Home > News Update > धोबी समाजाचं मुंबईत आमरण उपोषण

धोबी समाजाचं मुंबईत आमरण उपोषण

धोबी समाजाचं मुंबईत आमरण उपोषण
X

महाराष्ट्र राज्य परिट धोबी मंडळाचे बेमुदत आमरण उपोषण आजपासून आजाद मैदान मुंबई येथे सुरू झाले आहे. अनुसूचित जातीचे (एस सी) आरक्षण पूर्ववत लागू व्हावे म्हणून समाजाचे 30 वर्षापासूनच्या लढाईकडे व रास्त मागणीकडे प्रत्येक सत्तेतील सरकारने वारंवार तर दुर्लक्ष केलेच मात्र विद्यमान भाजपा सरकारने सुद्धा गेल्या साडेचार वर्षात या समाजाला निव्वळ आश्वासने दिली आणि राज्यातील धोबी समाजात राज्य सरकार विरोधी प्रचंड नाराजी असल्याने समाजाच्या वतीने आज पासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे.

राज्यातील धोबी समाजाने पूर्ववत आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण लढा चालवल्यानंतर १९९२ मध्ये तत्कालीन मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने राज्यातील धोबी समाज अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करीत असल्याने व भारतातील इतर राज्यात धोबी जातीला अनुसूचित जातीच्या सवलती मिळत असल्याने महाराष्ट्रात सुद्धा धोबी समाजाला अनुसूचित जात प्रवर्गाच्या यादीत समाविष्ठ करण्याची स्वयंस्पष्ट शिफारस असलेला अहवाल शासनाकडे सादर केला होता. तब्बल १७ वर्ष त्यांचा लढा धूळखात आहे. अनेकवेळा मोर्चे , आंदोलने , निवेदन देऊन देखील आश्वासने दिली गेली व त्यांना न्यायापासून वंचित ठेवले.

https://youtu.be/xjYk9Uod28U

Updated : 19 July 2019 1:27 PM GMT
Next Story
Share it
Top