Home > मॅक्स रिपोर्ट > धनंजय मुंडे यांची मालमत्ता होणार जप्त...

धनंजय मुंडे यांची मालमत्ता होणार जप्त...

धनंजय मुंडे यांची मालमत्ता होणार जप्त...
X

संत जगमित्र सुतगिरणीकडील जिल्हा बॅकेचे कर्ज घोटाळा प्रकरण, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. राज्यभर गाजलेला बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली असुन परळी येथील जगमित्र सुतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची अनेक वर्ष प्रलंबीत न्यायालयीन प्रक्रिया अखेर सुरु झाली असुन अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने जगमित्र सुतगिरणी प्रकरणी तीन कोटी रुपयांची वसुली करण्याकरीता धनंजय मुंडे यांचे घर, ऑफिस व विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहिती नुसार संत जगमित्र सुतगिरणी गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाने कडक ताशेरे ओढत जप्तीचे आदेश दिले आहेत. संत जगमित्र सुतगिरनी साठी बीड जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेताना अनेक नियमांचे ऊल्लंघन करुन कर्ज बुडीत गेल्यानंतर या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यासहित संत जगमित्र सुतगिरणी च्या संचालक मंडळांवर गुन्हे प्रलंबित होते.

Updated : 13 Sep 2018 9:05 AM GMT
Next Story
Share it
Top