Home > मॅक्स रिपोर्ट > तासगाव तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाकडून दलित व्यक्तीचा खून

तासगाव तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाकडून दलित व्यक्तीचा खून

तासगाव तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाकडून दलित व्यक्तीचा खून
X

तासगाव तालुक्यातील वायफळे येथे मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातंग समाज मदतीस आला नाही, याचा राग मनात धरून राजेश परशूराम फाळके यांच्यावर मंगळवारी रात्री तासगाव तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजेश भीमराव पाटील यांनी दारूच्या नशेत हल्ला केला होता. या हल्ल्यात फाळके गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी राजेश पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी रात्रीच पाटील यांच्यावर खुनी हल्ला व अँट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Updated : 6 Sep 2018 8:45 AM GMT
Next Story
Share it
Top