Home > मॅक्स रिपोर्ट > ‘भ्रष्टाचाऱ्यांची महानगरपालिका'

‘भ्रष्टाचाऱ्यांची महानगरपालिका'

‘भ्रष्टाचाऱ्यांची महानगरपालिका
X

गेली २५ वर्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेत सेना-भाजपची सत्ता आहे, मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आहे. पालिकेतील तळाच्या कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना लाचखोरीची कीड लागली की काय? असा प्रश्‍न पडतो. त्यातच घरत यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने पालिकेतील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत तब्बल ३२ लाच खोर पकडले आहेत. यात पालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी, गणेश बोराडे (सहाय्यक आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकारी), सुरेश पवार (उपायुक्त) आणि आता अतिरिक्त आयुक्त संजय घरत असे बडे अधिकारी आहेत. तर कर्मचारी पण आहेत. एप्रिल १९९५ तुकाराम संख्ये (सुपरवायझर), मार्च १९९६ मधुकर शिंदे (अन्न निरीक्षक), नोव्हेंबर १९९७ सुनील जोशी (कार्यकारी अभियंता), नोव्हेंबर १९९७ जयवंत म्हात्रे (उप.अभियंता), मार्च १९९८ राजधर केदारे (आरोग्य निरीक्षक), नोव्हेंबर १९९८ वसंत सांगळे (वरिष्ठ लिपिक), नोव्हेंबर १९९८ नारायण परमार (अधीक्षक), जानेवारी १९९९ वसंत खाडे (लिपिक), जानेवारी १९९९ धोंडीबा कातकर (कनिष्ठ अभियंता), एप्रिल २००० भालचंद्र नेमाडे (उप अभियंता), डिसेंबर २००८ अजित सिंग (लिपिक-शिक्षण मंडळ), एप्रिल २००० सुरेश पवार (उपायुक्त), फेब्रुवारी २०१० सुनील जोशी (अभियंता सहा.नगर रचन रचनाकार), सप्टेंबर २०१० प्रशांत नेर (लिपिक), नोव्हेंबर २०१० सुहास गुप्ते (ब प्रभाग क्षेत्र अधिकारी), नोव्हेंबर २०१० नवनीत पाटील (कामगार), फेब्रुवारी २०१४ गणेश बोराडे (ब प्रभाग क्षेत्र अधिकारी), एप्रिल २०१४ दतात्रय मस्तूद (उप अभियंता), एप्रिल २०१४ विलास कडू (शिपाई), मार्च २०१३ महमंद अन्वर खान (कामगार), २२ जुलै २०१६ विजय बनसोड, नोव्हेंबर २०१६ गणेश बोराडे (सहाय्यक आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकारी), नोव्हेंबर २०१६ प्रकाश चौधरी (उप अभियंता), डिसेंबर २०१६ जेजोराम वायले (ज्यू.लिपिक, आय-प्रभाग क्षेत्र कार्यालय), डिसेंबर २०१६ राजन ननावरे (वरिष्ठ लिपिक केडीएमसी परिवहन विभाग), जुलै २०१७

स्वाती गरुड (प्रभाग क्षेत्र अधिकारी जे -४), ऑक्टोबर २०१८ संजय धात्रक (आरोग्य निरीक्षक), ऑक्टोबर २०१७ सदाशिव ठाकरे (आरोग्य निरीक्षक), ऑक्टोबर २०१७ विजय गायकवाड (पालिका कर्मचारी).

पालिकेतील आजी माजी नगरसेवक

एप्रिल २०१४ मध्ये शिवसेना पुरस्कृत माजी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांना एका महिलेकडून बांधकाम पाडायचे नसल्याप्रकरणी ४ लाखांची लाच घेताना अटक. ऑक्टोबर २०१६ प्रभाग क्र. ४४ नेतीवली टेकडीचे विद्यमान भाजपा नगरसेवक गणेश भाने यांना अवैध बांधकामांविरोधात परवानगी देण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून एक लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

Updated : 15 Jun 2018 9:59 AM GMT
Next Story
Share it
Top