माणुसकीचं नातं! ‘या’ पालावरील लोक रोज पाहतात पोलिसांची वाट….

76

‘पहिलं पोलिस पाहिले की मला भीती वाटायची. मात्र, आता पोलिस आले की आम्हा हातावर पोट असणाऱ्यांच्या झोपडीत आनंद पसरतो. इस्लामपूर येथे राहणाऱ्या भटक्या जमातीतील व्यक्तीचे हे वाक्य. पोलिस पाहिले की अनेकदा लोक पोलिसांना घाबरतात मात्र, लॉकडाउन (Lock down ) च्या काळात इस्लामपूर येथे पोलिसांची ही प्रतिमा पूर्ण बदलून गेल्याचे दिसत आहे.

लॉकडाउन च्या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत. इस्लामपूर येथे वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे. घरट्यातील पिल्लानी आईची वाट पहावी. ती येताच चिव चिव करत चाऱ्यासाठी चोच उघडावी आणि आईने चोचीतून आणलेला चीमनचारा पिलांच्या चोचीत भरवावा. अशा आई आणि पिलाच्या दृश्याची आठवण दररोज या पालांच्या भोवती होते.पोलिसांच्या गाडीची लोक वाट पाहत बसतात. गाडी आली की, पिलानी आईच्या स्तनावर तुटून पडावे आणि भुकेचा मायाजाल शमवावा. असे हे ममतेने भरलेले चित्र पोलिसांनी सुरू केलेल्या एका अनोख्या प्रयोगाचे आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतर ठेवत शिस्तीत फूड पॅकेट्स लोकं घेतात.

इस्लामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी हा प्रयोग सुरू केला असून याला माणुसकीचं नातं असं नाव दिले आहे. याबाबत राम लीला सादर करणारे मारुती शिवलिंग विभुते सांगतात. आम्ही भजन रामलीला सादर करून लोकांकडून पैसे मागतो. त्यातून आमचा संसार चालवतो. Lockdown झाले आणि आमची चूल बंद पडली. गावात लोक येऊ देईनात अशा वेळी कुणीतरी आम्हाला पिंगळे सायाबाना जाऊन भेटा. असे सुचवले कल्लाप्पा विभूतेना घेऊन मी घाबरत घाबरत सायबांकडे गेलो. तर त्यांनी आमची हकीकत ऐकून घेतली व आधार दिला.

त्या दिवशी पासून पोलिस गाडी आमच्या पालाजवळ जेवन घेऊन येऊ लागली. पोलिसांनी आम्हाला शेवटपर्यंत सहकार्य करावे अशी विनंती ते करतात. या माणुसकीचे नाते या प्रयोगाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे सांगतात. इस्लामपूर येथे कोरोना व्हायरस चे रुग्ण सापडल्यानंतर शहर लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात या पालातील लोक अन्न मिळवण्यासाठी अशा वस्त्यांमध्ये येत होते.

यावर ते एका व्यक्तीवर संतापले मात्र, त्या व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रियेने या उपक्रमास जन्म दिला. ती व्यक्ती म्हणाली साहेब कोरोना या रोगाने शंभरातले तीन चार जण मरतील. मात्र, या भुकेच्या रोगाने शंभर च्या शंभर लोक मरतील.
यानंतर काही काळातच माणुसकीचे नाते हा Whats app तयार केला व त्यावर शहरातील उद्योजकांना आवाहन केले. आज या उपक्रमातून सहाशे पन्नास लोकांना सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या राहत्या ठिकाणी जेवन पोहोचं होत आहे.
या फूड पॅकेट्स चे पॅकिंग देखील पोलिस कॉन्स्टेबल करत आहेत. आणि उन्हामध्ये या पालात वाटप त्याचे वाटप केले जात आहे. एका बाजूला बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडत असतानाच माणुसकीचे नाते खाकी वर्दीने जपले आहे. या प्रयोगाने खाकी वर्दी बाबत लोकांच्या मनातला सन्मान दुणावेल यात शंका नाही.

कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराला हजर असलेल्या अखेर 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह

सांगली : अखेर ‘त्या’ 25 कोरोना बाधीत रुग्णांची टेस्ट निगेटीव्ह”
Lockdown : घरात अन्न नसल्यानं ३ वर्षाच्या बाळाने खाल्ले उंदराचे औषध!