Home > मॅक्स रिपोर्ट > कोरोना व्हायरस : काय बंद होणार? काय सुरु राहणार?

कोरोना व्हायरस : काय बंद होणार? काय सुरु राहणार?

कोरोना व्हायरस : काय बंद होणार? काय सुरु राहणार?
X

राज्यात कोरोनो ची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुर्तास मुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्वकाही 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच राज्यातील सर्व सरकारी कार्यालयां मध्ये 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावण्यात येत आहे. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता. मात्र, आता 25 टक्के कर्मचारी कामावर येतील.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...

अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार. त्यामुळं तुर्तास तरी या सेवा सुरु राहतील.

52 पैकी पाच रुग्ण विषाणू मुक्त, 14 दिवस निगराणी खाली ठेवून सोडलं जाईल.

संकट वाढलं तर काय करायचं या संदर्भात एका गटाची स्थापना

मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद करण्यात येत आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दूध, औषधी यांचा समावेश आहे. या शहरांमधील सुविधा तसंच अडचणीसंदर्भात कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.

ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहोत त्यांना माझे आवाहन आहे की, आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे. त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.

सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे. घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.

जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे.

अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.

काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे.

काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.

Updated : 20 March 2020 10:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top