Home > मॅक्स रिपोर्ट > रिझवी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांविरोधात विद्यार्थिनींची तक्रार

रिझवी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांविरोधात विद्यार्थिनींची तक्रार

रिझवी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांविरोधात विद्यार्थिनींची तक्रार
X

वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयातल्या ३०० विद्यार्थींनी दोन प्राध्यापकांविरोधात आंदोलन करीत आहे. हे दोन्ही प्राध्यापक कपडे, शरीरयष्टी यांच्यावर अश्लाघ्य कमेंट्स व पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या महिला विकास विभागाकडे एका विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार केली आहे. परंतू तक्रारीनंतरही महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थी काळे कपडे घालून याचा निषेध करत आहेत. मोहिन मर्चंट आणि एजाझ कश्मिरी हे ते दोन प्राध्यापक आहेत. त्यांच्या या अश्लाघ्य वर्तनावर तक्रार करणार्या विद्यार्थीनी ह्या इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्टचरच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. याआधी त्यांनी या प्रकरणी रिझवीचे उपप्राचार्य एजाझ कश्मिरी यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतू त्यांनी याकडे दूर्लक्ष केले. महाविद्यालयात स्थापित विद्यार्थिनी कल्याण समितीनेदेखील याबाबत कोणतीही चौकशी केली नाही. असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. अवेळी मेसेज पाठवणे, वैयक्तिक माहितीची चौकशी करणे, कपड्यांवर आक्षेप नोंदवणे असे सर्व आरोप या विद्यार्थिनींनी केले आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींना त्या दोन प्राध्यापकांबाबत अशा प्रकारचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 8 Sep 2018 10:52 AM GMT
Next Story
Share it
Top