Top
Home > News Update > युती होणार म्हणजे होणार मात्र, जुन्या फॉर्म्युल्यावर नाही - चंद्रकांत पाटील

'युती होणार म्हणजे होणार मात्र, जुन्या फॉर्म्युल्यावर नाही' - चंद्रकांत पाटील

युती होणार म्हणजे होणार मात्र, जुन्या फॉर्म्युल्यावर नाही - चंद्रकांत पाटील
X

'युती होणार म्हणजे होणार, अगदी तीनशे टक्के होणार. मात्र, १३५ जागांच्या जुन्या फॉर्म्युल्यावर नाही. भाजपची आमदारसंख्या लक्षात घेता, शिवसेनासुद्धा ते मान्य करेल’, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीमधील जागावाटपाचे गणित बदलणार आणि त्यावर भाजपचा वरचष्मा असेल, असे स्पष्ट संकेत शनिवारी येथे दिले. 'प्रेस क्लब'मध्ये आयोजित पत्रपरिषदेत पाटील म्हणाले, 'दोन्ही पक्षांना युती हवी आणि त्यांना त्याची गरजही आहे. त्यामुळे युती होणार की नाही, हा मुद्दाच नाही. शंभर नाही तर तीनशे टक्के सांगतो की, युती होणारच. फक्त जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Updated : 25 Aug 2019 5:22 AM GMT
Next Story
Share it
Top