Home > मॅक्स रिपोर्ट > ‘संविधान वाचवण्यासाठी नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी रॅली’

‘संविधान वाचवण्यासाठी नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी रॅली’

‘संविधान वाचवण्यासाठी नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी रॅली’
X

विरोधकांनी मुंबईत काढलेल्या संविधान बचाव रॅलीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत तिरंगा यात्रा आयोजित केली होती. या यात्रेची सांगता परळ येथील कामगार मैदानात झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘संविधान वाचवण्यासाठी नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी रॅली’

विरोधकांनी ही रॅली देशाचे संविधान वाचवण्यासाठी नाही तर स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी काढली, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे. तसंच विरोधकांची सत्ता गेल्यानंतरच संविधान धोक्यात येते का? संविधानाची शपथ घेऊन भ्रष्टाचार केल्याने संविधान धोक्यात येत नाही का? असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केला आहे.

‘भारताचे संविधान स्वयंभू आहे’

काही लोक वल्गना करतात की संविधान वाचवले पाहिजे. पण तुम्ही संविधान वाचवणारे कोण ? संविधानाची ताकद इतकी मोठी आहे की, हे संविधान कोणीही संपवू शकत नाही. हे संविधान वाचवण्यासाठी तुमच्यासारख्यांची आवश्यकता नाही. मी दावा करतो की, जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही देशाचे संविधान इतके सर्वोत्तम नाही. भारत लोकशाही देश आहे. त्याचे कारणच भारताचे संविधान बळकट आहे. शेजारी देशांमध्ये पाहा लोकशाही नांदू शकत नाही. मात्र भारताचे तसे नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘इंदिरा गांधींनी लोकशाही पायदळी तुडवली'

इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून लोकशाही पायदळी तुडवली, मात्र लोकांनी त्यांना निवडणुकांमध्ये नाकारले. संविधानाची ताकद काय आहे? याचा अनुभव इंदिरा गांधींनी त्यावेळी घेतला आहे. त्यामुळे संविधान कोणीही बदलू शकत नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

भाजपच्या विस्तारामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ

भाजपचा विस्तार होतो आहे तो विरोधकांना बघवत नाही. भाजपच्या विस्तारामुळे अनेक विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठतो आहे. आजची रॅली ही त्याचेच उदाहरण आहे असेही त्यांनी म्हटले. हे असले विरोधी पक्ष संविधानच्या मागे लपून आपले पक्ष वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. देशातील १८ पक्ष एकत्र येऊन देखील यांच्या पाठीमागे १८०० लोक देखील आले नाही. अशी टीका आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केली आहे.

Updated : 26 Jan 2018 4:04 PM GMT
Next Story
Share it
Top