Home > मॅक्स रिपोर्ट > #Christchurch न्यूझीलंड: 49 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 भारतीयांचा समावेश...

#Christchurch न्यूझीलंड: 49 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 भारतीयांचा समावेश...

#Christchurch न्यूझीलंड: 49 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 भारतीयांचा समावेश...
X

कट्टरतावाद फक्त भारतातच आहे असं नाही. तो पूर्ण जगात आहे. हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्चमध्ये झालेल्या हल्ल्यात 49 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 भारतीयांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या 6 मृत व्यक्तीमध्ये 1 पुण्यातील व्यक्तीचा देखील समावेश असल्याचं बोललं जातंय.

या सहा जणांमध्ये दोघेजण हैदराबादचे, एक गुजरातचा, एक नागरिक पुण्याचा असल्याचे भारताचे उच्चायुक्त संजीव कोहली यांनी बीबीसी मराठीला सांगितले. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 30 हजार लोक राहातात.

या हल्ल्याखोराने हल्ला करताना या घटनेचं लाईव्ह फुटेज सोशल मीडियावर टाकल्याचं देखील सांगितलं जातंय. हल्लेखोराने लहान मुलांवर अगदी जवळून गोळीबार केला असल्याचं समोर आलं आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. न्यूझीलंडसाठी हा एक काळा दिवस असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

Updated : 16 March 2019 5:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top