Home > मॅक्स रिपोर्ट > मराठा आरक्षण : चाकण हिंसाचार प्रकारणी २० जणांना अटक

मराठा आरक्षण : चाकण हिंसाचार प्रकारणी २० जणांना अटक

चाकण हिंसेचार प्रकरणी अटक सत्र सुरू झालं असून पोलिसांनी काल रात्री पासून कारवाई सुरू केली आहे. आता पर्यंत एकूण वीस जणांना अटक करण्यात असून अद्याप त्यांच्या नावा बाबत गुप्तता बाळगली आहे.

चौघे रात्री बारापर्यंत तर आणखी सोळा असे एकूण वीस जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. यामध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आले आहे. चाकणला कामासाठी आलेले, झोपडपट्टी आणि आसपासच्या ग्रामीम भागातील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्व आरोपिंना आज पुणे न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

सोमवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन चाकण येथे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्य चौकात उरतरले सकाळ पासून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जाळपोळ सुरू झाली. यात असंख्य बस आणि खाजगी वाहनांना पेटवण्यात आले तर काहींची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ३ हजार जणांच्या जमावावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अत्यंत शांत वातावरणात चाकणच्या मुख्य चौकात सुरू होते. ज्यावेळी जमाव पांगवण्यात आला त्यावेळी अचानक एकाने बस च्या दिशेने दगड फिरकवला आणि मोर्चाला हिंसक वळण लागले, त्यानंतर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या, याप्रकरणी चाकण पोलिसात तब्बल ३ हजार जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला अश्या प्रकारचा ठपका गुन्हा दाखल झालेल्या समाजकंटकावर ठेवण्यात आला. दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या जाळपोळ मध्ये ३० बस ट्रक, पोलिसांची खाजगी आणि सरकारी वाहन जाळण्यात आली आहेत. तर सर्वसामान्य जनतेच्या वाहनांना देखील लक्ष आंदोलनातील समाजकंटकानी केले आहे. यात शंभर च्या जवळपास वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र आता याच समाजकंटकावर पोलीस कारवाई करताना दिसत असून २० जणांना ताब्यात घेतलं आहे.

Updated : 2 Aug 2018 10:47 AM GMT
Next Story
Share it
Top