Home > News Update > ‘आता जी मदत येते ती चौकातच येते, माझ्या कंबरेला मार लागला आहे, चौकात कसा जाऊ?'

‘आता जी मदत येते ती चौकातच येते, माझ्या कंबरेला मार लागला आहे, चौकात कसा जाऊ?'

‘आता जी मदत येते ती चौकातच येते, माझ्या कंबरेला मार लागला आहे, चौकात कसा जाऊ?
X

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमनापूर गावात पूराचं पाणी शिरल्यानं गावातील अनेक घरं पडली आहेत. तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याने ती कमकुवत झाल्यानं प्रशासनानं गावकऱ्यांना या घरात न राहण्याचा सल्ला दिला आहे.

मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या अमनापूर गावात अनेक मुस्लीम बांधवांची घर पडली आहेत. त्यातच पुराने घर उद्धस्त झालेलं असताना मुस्लीम बांधवांचा ईदचा सण आल्यानं अनेक मुस्लीम बांधवांना यंदा ईदचा सण साजरा करता आला नाही. या संदर्भात अमनापूर गावातील सुतार कुटुंबांशी जेव्हा मॅक्समहाराष्ट्रने संपर्क साधला असता, सुतार यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना...

पुराचं पाणी पाच ते साडेपाच फूट घरात शिरल्यानं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं. ‘ज्या दिवशी पुराचं पाणी वाढत होते रस्ता बंद पडत होता. तेव्हा घरातून बाहेर पडलो. आणि 5 ते 6 दिवसानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर पुराने घरात आलेली घान काढून घराच्या बाहेर टाकली. सध्या हेच काम सुरु आहे. त्यात घरं गळतंय म्हणून घरावर कागद घालण्यासाठी गेलो असता, आणि उतरत असतानाच पाया खालचा वासा मोडल्यानं 10 फुटावरुन खाली पडलो, आणि माझ्या कंबरेला मार लागला. आणि डॉक्टरकडे जाऊन बेल्ट लावला आहे. डॉक्टरकडे जाऊन औषध घेतलं आहे. आता कुठं जाता येत नाही. कोणी मदत आणून दिली तरच घ्यायची आता पळता येत नाही कुठं जाता येत नाही. आम्ही कुठं जात पण नाही. कालचा ईदचा जो सण झाला, सणामध्ये फक्त नमाज पठण केले. आणि ईद तेवढ्यावर संपवली’. असं म्हणत सुतार यांनी या वर्षी पुरामुळे ईद साजरा करता न आल्याची खंत बोलून दाखवली.

पुरात किती नुकसान झालं हे सांगताना सुतार यांनी... 8 ते 10 हजारांपर्यंत घरातील सामानाचं नुकसान झाल्याचं सांगितलं. तर घराचे 30 ते 35 हजाराचे नुकसान झाल्याचं सांगितल... आहे हे मेटेरिअरल आणि सिमेंट वाळू म्हणलं तर 50 हजार दुरुस्तीला जाणार. ‘धान्य होतं, कपडे होते, सगळ्या मुलांची पुस्तक, वह्या पुस्तक, दोन मुलींची दफ्तर गेली आहेत. आता शासन काय ठरवतं हे पाहू. घरात काम करणारे म्हणलं तर एक मुलगा, माझं वय म्हणलं 70 वर्षे झालं आहे. त्यामुळे मी आता कुठं काय कामाला जाऊ शकत नाही. मुलगा स्लाईडींगच्या खिडक्याचे काम करतो. दिवसाला 300 ते 500 रुपये मिळतात. जसं काम असेल तसे पैसे मिळतात.’ आता जी मदत येते ती चौकातच येते. माझ्या कमराला मार लागला आहे. मी फिरु शकत नाही’. घरी येऊन जी मदत दिली जाते. तेवढीच घेतो असं म्हणत राज्यभरातून जी मदत येते ती शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. असं म्हणत राज्यातून येणारी मदत फक्त गावातील चौकातील लोकांनाच मिळते. असं म्हणत येणारी मदत गावातील इतर पुरग्रस्त भागात पोहोचावी. अशी आशा व्यक्त केली आहे.

Updated : 20 Aug 2019 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top