Home > मॅक्स रिपोर्ट > भाजप आमदाराची मुक्ताफळं मातंग समाजाला म्हटलं साडेसाती

भाजप आमदाराची मुक्ताफळं मातंग समाजाला म्हटलं साडेसाती

भाजप आमदाराची मुक्ताफळं मातंग समाजाला म्हटलं साडेसाती
X

गेल्या काही दिवसांपासुन भाजपचे आमदार राम कदम त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे टीकेचे धनी बनले आहेत. त्यानंतर भाजप श्रेष्टींनी सर्वाना जपुन बोलण्याचे आदेश दिले आहे मात्र, अजूनही भाजपच्या आमदारांची बेजबाबदार विधानं कमी झालेली नाहीत. झालाय असं की, गेल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना उदगिरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मातंग समाजाला साडेसाती म्हणत हालगी वाजवणाऱ्याला पाचशे रुपये देऊन लांब करतो असे वक्तव्य केले! त्यानंतर सोशल मीडियावर आता त्यांच्या या भाषणाची क्लिप चांगलीच व्हायरल करण्यात आली आहे. त्यावर आता मातंग समाजाने आपल्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत मातंग समाजाच्या विविध संघटनांनी आमदार भालेराव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या वाचाळ नेत्यांच्या यादीत सुधाकर भालेराव यांच्या नावाची भर पडली आहे.

Updated : 9 Sep 2018 12:46 PM GMT
Next Story
Share it
Top