Home > मॅक्स रिपोर्ट > अमरावती जि.प.मधून सोनिया-राहुल गांधींचे फोटो भाजप कार्यकर्त्यांनी काढले

अमरावती जि.प.मधून सोनिया-राहुल गांधींचे फोटो भाजप कार्यकर्त्यांनी काढले

अमरावती जि.प.मधून सोनिया-राहुल गांधींचे फोटो भाजप कार्यकर्त्यांनी काढले
X

अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो का लावले नाहीत, असा जाब विचारत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दालनात लावलेले यांचे फोटोच काढून टाकले. यावेळी जि.प. अध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून निषेध केला. अमरावती जि.प. काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये हा संघर्ष सुरू झालाय.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष काही कामानिमित्य बाहेर गेले होते आणि त्याच वेळेस भाजप ग्रामीण अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आपल्या कार्यकर्त्यांसह अध्यक्षांच्या कक्षात गेले व अध्यक्ष यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर याच वेळी अध्यक्ष यांच्या कक्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो का लावले नाही यावरून घोषणाबाजी केली.

अमरावती जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेस ची सत्ता आहे. त्यामुळे अध्यक्ष यांच्या कक्षात सोनिया गांधी, राहुल गांधी व स्थानिक आमदार यांचे फोटो लागले आहेत. मात्र ते फोटो भाजप च्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान काढून फेकल्याने येत्या काळात अमरावती जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated : 8 July 2019 4:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top