Home > मॅक्स रिपोर्ट > आरएसएसचा झेंडा काढला म्हणून नोकरी गमावली...!

आरएसएसचा झेंडा काढला म्हणून नोकरी गमावली...!

आरएसएसचा झेंडा काढला म्हणून नोकरी गमावली...!
X

सध्या आपण अशा कालावधीतून जात आहोत का? की, जिथं फक्त सत्ताधारी पक्षाशी निगडीत असलेल्या संघटनांमधील लोकांचेच चालते. कारण उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आपलं कर्तव्य बजावलं म्हणून त्याला नोकरीतून राजीनामा द्यावा लागला आहे.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या मिर्जापूर कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. किरण दामले असं नोकरी गमावलेल्या व्यक्तीचं नाव असून या व्यक्तीने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आरएसएस चा लावलेला झेंडा काढला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी राग व्यक्त करत त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे दामले यांची नोकरी घेऊनही हे लोक शांत बसले नाही. तर त्यांच्या विरोधात ‘लोकांची धार्मिक आस्थेला ठेच पोहोचवली’ असं कारण देत त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आरएसएस चे काही विद्यार्थी विद्यापीठात सकाळी शाखा लावत होते. म्हणजे सकाळी-सकाळी संघाचा होणारा कार्य़क्रम करत होते. त्या ठिकाणी संघाचा लावलेला झेंडा दामले यांनी काढला. आणि त्यानंतर दामले यांना त्रास द्यायला सुरुवात झाली.

दामले यांच्या समस्या इथंच थांबल्या नाहीत. तर इथल्या संघाच्या लोकांनी त्यांना त्रास देऊन राजीनामा द्यायला देखील भाग पाडले. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. ‘लोकांची धार्मिक आस्थेला ठेच पोहोचवली’ असं तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांच्या विरोधात एफआयआर ची नोंद देखील करण्यात आल्याचं वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.

मी शाखा लावणाऱ्या लोकांना सांगितलं की, तुम्ही झेंडा स्वत: हटवा. मात्र, त्यांनी माझं म्हणनं ऐकलं नाही. मी झेंडा काढला आणि शिपायाला दिला. जेव्हा संघाचे लोक माझ्याकडे आले. मी सांगितलं... अशा संवेदनशिल वेळी हा झेंडा नाही लावू शकतं. मी आपल्याला याची परवानगी नाही देऊ शकतं.

त्यानंतर आरएसएस च्या लोकांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर आंदोलन सुरु केले आहे. दामले यांनी झेंड्यांचा अपमान केला आहे. संस्कार नावाच्या मुलाने खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, आम्ही सकाळी 6 वाजता शाखा लावत होतो, जिथं आम्ही प्रणायाम आणि योगासन करत होतो. दामले आल्या आणि त्यांनी झेंड्याचा अपमान केला. त्यांनी सांगितलं की, परिसरात शाखा लाऊ शकत नाही. कारण इथं एखाद्या विशिष्ट समुदायाला विशेष सुट दिली जाऊ शकत नाही.

बीएचयू च्या मिर्जापूर येथील साउथ कॅम्पस मधील प्रमुख असलेल्या रमादेवी निमन्नपल्ली यांनी दामले यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली असून... ‘किरण दामले यांनी राजीनामा दिला आहे. मी हा उप कुलगुरू यांना पाठवला आहे. आम्ही निर्णयाची वाट पाहत आहोत. किरण दामले यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी हे चुकून केलं आहे.... त्यांना माहित नव्हतं की, आरएसएस चा झेंडा इतका सम्मानित असतो. मी ही बाब पुढे नेऊ इच्छित नाही. पण एफआयआर ची नोंद करणं माझ्या हातात नाही’.

कॉंग्रेस ने या घटनेचा निषेध केला आहे, माजी आमदार ललितेश त्रिपाठी यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिय़ा दिली. शैक्षणिक संस्थामध्ये आरएसएस ची शाखा लावल्या जाऊ नयेत. तसंही आरएसएस कार्यकर्त्या सोबत असणारे लोक बाहेरचे आहेत. ते विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाहीत.

Updated : 15 Nov 2019 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top