Home > मॅक्स रिपोर्ट > शेतकऱ्यांना मदत मिळाली शेतमजूरांचं काय?

शेतकऱ्यांना मदत मिळाली शेतमजूरांचं काय?

शेतकऱ्यांना मदत मिळाली शेतमजूरांचं काय?
X

महाराष्ट्रात (Maharashtra) परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी आजचं भागलं तर उद्या काय खावं अशा विवचंनेत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतमजूराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या रोजगोरावर देखील परिणाम झाला आहे.

परभणी (Prabhani)जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सलग 20 दिवस अतिवृष्टी झाली. यामुळे कापणीस आलेल्या सोयाबीनसह कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसानं कापसाच्या अक्षरश: वाती झाल्या आहेत. सोयाबीन पाण्यात खराब झाली आहे. कपाशी मातीत मिसळली आहे. अन्य पीकं देखील उद्धवस्थ झाली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यासह शेतमज़दूर देखील मेटाकुटीला आला आहे.

हे ही वाचा...

तेव्हा ‘ते’ गोधडीत रांगतही नव्हते – संजय राऊत

पुण्याचे व्हायरल स्वच्छता सेवक

मुख्यमंत्री सहायता निधी त्वरीत सुरू करावा- आदेश बांदेकर

कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं. कापूस पिकावर शेतकऱ्यांसह मजूराला देखील चांगला रोजगार मिळतो. कापूस जर चांगला असेल तर मजूर सकाळीच कापसाच्या शेतात सकाळीच पोहोचतात. सकाळी कापसावर दव असल्यामुळे कापूस वजन देईल अशी त्यांची धारणा असते. म्हणून ते सकाळीच कापूस वेचणीला सुरुवात करतात.

साधारण एक शेतमजूर कापूस चांगला फुटलेला असेल तर सकाळपासून 40 किलो ते 50 किलो कापूस वेचतो. किलो मागे शेतमजूराला साधारण पणे 10 रुपये मिळतात. म्हणजे एका दिवसाला 400 ते 500 रुपये रोज कमवू शकतात. या पैशात मुलांचे शिक्षण, घर खर्च भागवला जातो. बहुतांश शेतमजूरांकडे जमीन नसल्यानं ते दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन या पैशात भाजीपाला, धान्य विकत घ्यावं लागतं. सध्याच्या काळात दोन पैसे कमवण्याची त्यांची संधी असते. मात्र, दिवसभर शेतात राबराब राबुन देखील शेतमजूरांचा 20 ते 25 किलो कापूस वेचून होतो. त्यात त्यांना 100 ते 150 रुपये रोज मिळतो. यात घर खर्च कसा भागणार? असा सवाल शेतमजूर उपस्थित करत आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाच्या वाती झाल्या आहेत. कापूस खराब झाला आहे. अशा परिस्थितीत कापूस कमी प्रमाणात वेचून होतो. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळं तो शेतमजूरांना पैसे वाढवून देऊ शकत नाही. तर दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्यानं शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणात रोजगार गेला आहे. त्यामुळं पोटासाठी जिथं काम मिळेल, तिथं शेतमजूर कमी भावात कामासाठी जात आहेत. गरजवंताला अक्कल नसते त्या प्रमाणे अशा परिस्थिती सध्या ग्रामीण भागात शेतमजूर मिळेल ते काम करायल तयार झाले आहेत.

या संदर्भात आम्ही काही शेतमजूराचं म्हणनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी शेतकऱ्यांना सरकार मदत करेल पण आमचं काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आमचं हातावर पोट आहे. सरकार शेतीचं नुकसान झालं म्हणून शेतकऱ्यांना मदत करेल, पण त्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजूरांचं काय? त्यांचा सध्या रोजगार गेला आहे. हातभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी त्यांना रानात मिळेल ते काम करावं लागत आहे.

शाळा कॉलेज मध्ये शिकणारी मुलं देखील कापूस वेचण्यासाठी जात आहेत. कारण शेतमजूर असलेले पालक त्यांचा खर्च भागवू शकत नाही. त्यामुळे शाळा बंद होण्याची भीती त्यांच्यासमोर कायम आहे. त्यामुळे सरकारने जशी शेतकऱ्यांना मदत केली तशी या शेतमजूरांना देखील मदत करावी असं या शेतमजूरांचं म्हणणं आहे.

Updated : 18 Nov 2019 6:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top