Home > मॅक्स रिपोर्ट > “अरुण जेटली राजीनामा द्या”

“अरुण जेटली राजीनामा द्या”

“अरुण जेटली राजीनामा द्या”
X

स्वत: विजय मल्ल्याने देश सोडण्यापुर्वी आपण अरुण जेटली यांची भेट घेतल्याचा गौप्य स्फोट केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देश सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती. दोघांमध्ये ही अनौपचारिक भेट झाली होती असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते पुनिया यांचा जेटलीवर गंभीर आरोप

'माझ्यासमोर अरुण जेटली विजय मल्ल्यांना भेटले. १ मार्च २०१६ रोजी ससंदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे. मी जर खोटे बोललो तर राजकारण सोडून देईन' असा दावा कॉंग्रेस नेते पुनिया यांनी केला आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्या या खळबळ जनक आरोपानंतर भाजप बॅकफुटवर गेल्याचे चित्र असून अरुण जेटली यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated : 13 Sep 2018 9:31 AM GMT
Next Story
Share it
Top