Home > मॅक्स रिपोर्ट > अंकिता पाटील यांची इंडियन शुगर मिल असोशियन समितीत नियुक्ती

अंकिता पाटील यांची इंडियन शुगर मिल असोशियन समितीत नियुक्ती

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शुगर मिल्सचे डायरेक्टर जनरल अबिनाश वर्मा यांनी अंकिता पाटील यांना पत्र दिले. २०१४च्या निवडणूकीत वडील हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारा दरम्यान अंकिताचे नेतृत्व दिसण्यास सुरवात झाली होती. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्या आता उतरतांना दिसत आहेत. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही भारतातील साखर कारखानदारीतील एक अग्रगन्य संस्था असून या संस्थेच्या सदस्यपदी अंकिता यांची निवड झाल्याने इंदापूर तालुक्याबरोबर राजकीय वर्तुळात त्यांचे कौतुक केले जात आहे. सध्या त्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे.

Updated : 9 Feb 2019 9:58 AM GMT
Next Story
Share it
Top