Home > मॅक्स रिपोर्ट > अमित शाह यांचे अध्यक्ष पद कायम...

अमित शाह यांचे अध्यक्ष पद कायम...

अमित शाह यांचे अध्यक्ष पद कायम...
X

आज आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे भारतीय जनता पार्टीची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पार्टीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात असून या बैठकीचा मुख्य विषय अनुसुचित जाती जमातीवर असणार आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचा कार्यकाल जानेवारी २०१९ ला संपणार आहे. मात्र, त्यांना आगामी २०१९ च्या निवडणुकापर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

अमित शाहा यांचा दावा...

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला, २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. त्यांनी बैठकीत अजिंक्य भाजपाचा नारा दिला. शाह यांनी सांगितले की, एससी / एसटीच्या विषयावर गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीवर परिणाम करणार नाही.

या मुद्दयांवर होणार चर्चा...

अहवालानुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळाची चर्चा, सामाजिक न्याय आणि आर्थिक यश या विषयावर चर्चा होईल. याशिवाय एससी-एसटी अॅक्ट, अनुसुचित जाती जमातीवर चर्चा, तेलाच्या वाढत्या किंमती, एनआरसी, आर्थिक प्रगती या विषयांवरही चर्चा होईल. अनुसुचित जाती जमातीवर लक्ष केँद्रित केल्यामुळे ही बैठक आंबेडकर इंटरनेशनल सेंटरला आयोजीत करण्यात आली आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणनीती चर्चेत...

या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणनीती चर्चेत आहे. येत्या काही दिवसात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत.

पंतप्रधान राहणार उपस्थित...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी या बैठकीला उपस्थित राहणार असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. बैठकीत सर्व राज्यातील पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

तेलंगणमध्ये मोर्चा लवकरच सुरू होईल...

अमित शाह १५ सप्टेंबरला तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चा काढणार आहेत. भाजपचे नेते एन. रामचंद्र राव यांनी यावेळी महबूबनगरमध्ये एक प्रचंड जाहीर सभा होणार असल्याची माहिती दिली.

Updated : 8 Sep 2018 1:15 PM GMT
Next Story
Share it
Top