पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्याच्या पुर्वसंध्येला ‘न्यूज नेशन’ या खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. या मुलाखतीत बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मोदींनी जे काही विधान केले आहे. त्या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून व्यंगचित्रकारांसह पत्रकारांनी मोदींच्या या मुलाखतीचा खरपूस समाचार घेतला आहे.
आता पंतप्रधानांनी काय म्हटलंय हे एकदा पाहूया...
"बालाकोटमध्ये हवाई हल्ला करण्याच्या दिवशी वातावरण ढगाळ होतं. कारवाई करायची की पुढे ढकलायची याबद्दल संभ्रम होता. मात्र ढगाळ वातावरण, पावसामुळं आपली विमानं पाकिस्तानी रडारपासून वाचू शकतात, असा विचार माझ्या मनात आला आणि मी कारवाई करण्याचा निर्णय घेतला,"
असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
त्यानंतर पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोदींवर नेटिझन्सनी चांगलीच टीका केली आहे. दरम्यान मोदींचे हे विधान गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही ट्विट करण्यात आलं होतं. मात्र, मोदींच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याने भाजपने हे ट्विट डिलीट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यमान काळातील विविध घटनांना भुतकाळातील घटनांशी जोडून देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करत असतात. हाच धागा पकडत अमर उजालाने एक व्यंगचित्र काढले आहे.
सौजन्य : अमर उजाला
या व्यंगचित्रात देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ढगाआड लपवल्याचं दाखवण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढगाळ वातावरणामुळं, पावसामुळं आपली विमानं पाकिस्तानी रडारपासून वाचू शकतात. या विधानावर भाष्य केलं आहे.
पाहुया काय म्हटलंय नेटिझन्सनी
Updated : 13 May 2019 4:53 AM GMT
Next Story