Home > मॅक्स किसान > देशातील ४२ टक्के भागात दुष्काळ

देशातील ४२ टक्के भागात दुष्काळ

देशातील ४२ टक्के भागात दुष्काळ
X

भारतातील ४२ टक्के भागांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्क्यांनी जास्त आहे. दुष्काळाची पूर्वसूचना देणाऱ्या डीईडब्ल्यूएस ने ही माहिती दिली आहे. डीईडब्ल्यूएस च्या माहितीनुसार दुष्काळग्रस्त भागांचं प्रमाण दिवसागणिक वाढतंय. २१ मे ला ४२.१८ टक्के भागात दुष्काळी परिस्थिती होती तर २८ मे पर्यंत ती वाढून ४२.६१ टक्के झाली. २७ फेब्रुवारीला ४१.३० भागात दुष्काळ नोंदवला गेला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात ३६.७४ टक्के भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती.

Updated : 3 Jun 2019 4:24 AM GMT
Next Story
Share it
Top