Home > News Update > राज्यात दररोज ३० मुलांचे अपहरण – NCRB

राज्यात दररोज ३० मुलांचे अपहरण – NCRB

राज्यात दररोज ३० मुलांचे अपहरण – NCRB
X

प्रगत म्हंटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी एक काळजी वाढवणारी बातमी....लहान मुलांचं अपहरण होण्याऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं NCRB ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय. २०१८ वर्षासाठीच्या अहवालात ही माहिती देण्यात आलीये.

क्राय ‘चिल्ड्रेन्स राइट्स अँन्ड यू’ ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २०१८ या एका वर्षात लहान मुलांचे अपहरण आणि पळवून नेण्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद झालीये. तर अपहृत मुलांपैकी ७२ टक्के मुली आहेत. लहान मुलांशी संबधित गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र देशभरात तिसऱ्या स्थानावर आहे. राज्यात दररोज असे ३० गुन्हे घडतात, तर इतर काही विशिष्ट गुन्ह्यांच्या प्रमाणातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं NCRB ने प्रसिद्ध केलेल्या २०१८ च्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

लहान मुलांचं अपहरण होण्याच्या सर्वाधिक घटनां उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार ह्या राज्या नोंदवण्यात आल्या आहेत. देशातील एकूण अपहरणाच्या घटनांपैकी ५१ टक्के घटना या पाच राज्यांमधील आहेत. ‘क्राय’ ने केलेल्या विश्लेषणानूसार १६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींबाबत अशा घटना घडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर राज्यातील एकूण घटनांमध्ये मुलींबाबात घडणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण ७२ टक्के आहे.

  • NCRB च्या 2018मधील अहवालानुसार अपहरणाच्या घटना

वय मुलं मुलीएकृण
६-१२६५६४६३१११९
१२-१६१३२८२८९४४२२२
१६-१८१००२४२८०५२८२
एकूण२९८६७६३७१०६२३

गेल्या एका वर्षात या गुन्हेगारीच्या ६ हजार २३३ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. देशभरातील पॉस्को अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी हे प्रमाणा १६ टक्के आहे. त्याशिवाय लहान मुलांच्या खुनाच्या बाबतीतही राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८मध्ये २०१७ च्या तुलनेत लहान मुलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहे.

मुलांबाबत घडणारे प्रमुख गुन्हे

नोंदवल्या गेलेल्या घटना २०१७नोंदवल्या गेलेल्या घटना

२०१८

वाढलेली टक्केवारी
अपहरण८७४८१०११७१५.६
पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हे५२४८६२३३१८.४
खून१४५१७९२३.४

NCRB प्रसिद्ध केलेल्या माहितीचे विश्लेषण करताना क्राय- पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक क्रिएन रावडी म्हणतात, की मुलांबाबत घडणाऱ्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. मात्र, अशा घटनांबाबत तक्रारी नोंदवण्याचे वाढते प्रमाण लोकांमधील जागरुकता वाढत असल्याचे सकारात्मक चिन्ह आहे. लहान मुलांसाठी संरक्षक यंत्रणा तयार करणे तसेच लहान मुलांच्या संरक्षणाशी संबधित धोरणांची अंमजलबजावणी करण्यासारखे उपाय हे मुलांबाबत घडणारे गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे आहे.

Updated : 16 Jan 2020 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top