Home > मॅक्स रिपोर्ट > ५ तारखेनंतर पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ नाही

५ तारखेनंतर पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ नाही

५ तारखेनंतर पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ नाही
X

महाराष्ट्र सरकारने पीक विमा भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. परंतु त्यानंतर पिकविमा भरण्याची मुदत वाढवली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या अजूनही बँकांबाहेर रांगा लागल्या आहेत. राज्य सरकार त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ कामला लावून तेथील शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेईल. आतापर्यंत ७ कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. मुदतवाढीमुळे यात आणखी वाढ होणार आहे.

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही शेतकरी ५-५ बँकांमध्ये विमा भरत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी १ कोटीपर्यंत पीक विमा उतरवला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे पीक विम्याचा गैरव्यवहार टाळण्यासाठी पुढील वर्षापासून पीक विम्यासोबत केवायसीही भरून घेण्यात येईल.

Updated : 2 Aug 2017 8:29 AM GMT
Next Story
Share it
Top